चिंचवडला 4 तासात 10.45 टक्के तर कसब्यात 8.25 % ! चिंचवडला जगताप व कलाटे समर्थकांत एकमेकांत वादावादी…!

पुणे : चिंचवड मतदारसंघात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी 10.45 % तर याच वेळेत कसबा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी- 8.25 % होती. चिंचवड मतदान प्रक्रियेत जगताप व कलाटे समर्थकांत झटापट होऊन वादावादी झाल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे.
चिंचवड विधानसभा मतदार सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी- 3.52 % होती. कसबा मतदारसंघात सकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
अनेक मतदान केंद्रावर हळद-कुंकू लावून मतदारांचे स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांच्या पायघड्या घालून आणि फुले देऊन मतदारांचं स्वगत केलं जात आहे. जेष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची देखील सोय करण्यात आली आहे.
Views:
[jp_post_view]