चीन आणि तजाकिस्तानमध्ये तीव्र 6.8 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के…!
चीन : आज पहाटे चीन-तजाकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या झिजियांग प्रांतात 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंप झाल्याची माहिती अमेरिकेच्या भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली आहे.
याबरोबरच तजाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं अमेरिकेच्या भूवैज्ञानिक विभागाने सांगितले आहे. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. उइगर प्रांतातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार तजाकिस्तानमध्ये भूंकप आला. हा परिसर डोंगराळ आहे. भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारण या परिसरात मानवीवस्ती नाही. परंतु अद्याप चीनच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.
Views:
[jp_post_view]