धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..


मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ८२ दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याच स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

आपल्या पीए मार्फत त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात माहिती दिली आहे. आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे.

पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारुन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!