मुख्यमंत्री फडणवीसांची खेळी ; ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी दोन शिलेदार मैदानात उतरवणार ; कोण बाजी मारणार?


पुणे : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन लढेल, अशी चर्चा सुरु आहे. असे असतानाच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाच्या कामगार सेना उत्कर्ष पॅनल हे एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. आता ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी खेळी केली आहे. या निवडणुकीसाठी ते दोन शिलेदार मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल ठरलं आहे. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात उतरणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपचं सहकार समृद्धी पॅनल हे निवडणूक लढणार आहे. भाजपकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे बेस्ट पतपेढी निवडणूक ही अटीतटीची ठरणार असल्याच दिसून येत आहे.दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी खेळी खेळली आहे.

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. ठाकरे बंधूंनी ‘उत्कर्ष पॅनेल’ अंतर्गत बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी युती केली आहे. बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाच्या कामगार सेना उत्कर्ष पॅनल म्हणून ही निवडणूक एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!