मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेनां धक्का ; मुख्यमंत्री कार्यकाळात घेतलेला ‘तो ‘निर्णयच केला रद्द…


पुणे : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना धक्क्यावर धक्के दिले आहेत. अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधी राज्य मंत्रिमंडळाने काल 21 महत्त्वाचे निर्णय घेतले. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील आणखी एक निर्णय रद्द करण्यात आला आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या धर्तीवर राज्यात सप्टेंबर 2022 मध्ये स्थापन करण्यात आलेली राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी महा आर्क लिमिटेट बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या निर्णयाची चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर सुरू होती.

मंत्रिमंडळ बैठकीत इतर कोणते महत्त्वपूर्ण निर्णय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागलेलं असताना काल या बैठकीत तब्बल 21 निर्णयांना मंजुरी देण्यात आली. विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घ्याव्या लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी देण्याला मंजुरी देण्यात आली असून इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा यामध्ये समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.
.
दरम्यान याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय रद्द केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!