वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय…


पुणे : सध्या आषाढी एकादशी काही दिवसांवर आली असून पालखीचे नियोजन सुरू आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता प्रवास करता यावा, यासाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

यासाठी राज्यभरातून तब्बल 5 हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 25 जून ते 5 जुलैदरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यात्रा काळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविकांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!