शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -राज ठाकरेंची भेट..!
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
याचदरम्यान, मालेगावात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. या सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.
Views:
[jp_post_view]