संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला! सरकारने घेतला मोठा निर्णय…

बीड : गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चांगलेच गाजले आहे. याबाबत कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केली होती.

याबाबत आता त्यांनी शब्द पाळत घोषणेची अंमलबजावणी करत हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. यामुळे आता तरी खरे आरोपी सापडणार का? आणि त्यांना शिक्षा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीसह न्यायालयीन चौकशी होणार असे सांगितले होते. याबाबत सरकारकडून आदेश न निघाल्याने विरोधक आक्रमक झाले होते. आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत या न्यायालयीन चौकशी समितीचे मुख्यालय हे बीड येथे असणार आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी हत्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. यामुळे न्यायाची अपेक्षा आहे. या समितीला सगळे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच अहवाल राज्य सरकारकडे सादर करावा लागणार आहे.
याबाबत पोलिसांकडून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर मोक्का लावण्यात आला. एक आरोपी अजून फरार आहे. वाल्मीक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे.