मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तरुणांसाठी मोठी घोषणा! पुण्यातील औद्योगिक विकासाबाबत घेतला महत्वाचा निर्णय…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाचा प्रचार सुरू आहे. सर्व पक्ष आपले नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीच्या स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
याठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या विकासासाठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी तरुणांसाठई रोजगारनिर्मिती वाढवण्याच्या दृष्टीने औद्योगिक वसाहती वेगाने विकसित करण्याचे आश्वासन दिले. यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करण्यासाठी एमआयडीसी संदर्भातील बैठक अधिवेशनात घेतली जाईल. विकास योजनांना सरकारकडून आवश्यक पाठबळ दिले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी त्यांनी संग्राम थोपटे यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.

तसेच मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही फक्त भाषण करणारे नाहीत, जे बोलोत ते प्रत्यक्षात करून दाखवलो. रोजगारासाठी एमआयडीसीची एकही इंच जमीन वाया जाणार नाही. थोपटे यांनी मांडलेल्या विकास योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. असाही शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

दरम्यान, यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, संग्राम थोपटे, स्वरूप थोपटे, शेखर वढने, स्नेहल दगडे, योगस तिलेकर, संजय जगताप यांच्यासह अनेक उमेदवार उपस्थित होते. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील निकाल कसे लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
