मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!! हिंदी सक्तीबाबत दोन्ही निर्णय रद्द….

मुंबई : हिंदी सक्तीवरून वाद उफाळलेला असताना हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासननिर्णय रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता.देवेंद्र फडणवीस म्हणाले, अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानासाठी बोलवले होते
विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. मराठीचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने विरोधकांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या 24 चुका आहेत. आजच्या पत्रावर भास्कर जाधव यांची सही दिसत नाही. सह्यांमध्ये पाच तीन दोन झालं. वडेट्टीवार आज पत्रकार परिषदेत असं म्हणाले की, आमच्या कामांना स्थगिती मिळाली.
त्यांना अजूनही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत असं वाटतंय. राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केले. कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल हा निर्णय आम्ही घेतला आहे. पण झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचा सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही. असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
तसेच ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधी कर्नाटकन लागू केले. मध्यप्रदेश, तेलंगणा नंतर उत्तर प्रदेशने. 21 सप्टेंबर 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे शैक्षणिक धोरण कशाप्रकारे लागू करायचे याविषयीची तज्ञ समिती नियुक्त केली होती. 16 ऑक्टोबरला त्याचा जीआर निघाला होता, असेही ते म्हणाले.