Chicken Shawarma : चिकन शोरमा खाल्ल्याने १९ वर्षीय तरुणाचा दुःखद अंत, धक्कादायक कारण आले पुढे
Chicken Shawarma : खराब झालेला शोरमा खाल्ल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील मानखुर्द परिसरातून समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकणी पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रयजा शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, शोरमा खाल्ल्यानंतर तरुणाला उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला, त्यानंतर या तरुणाला उपचारासाठी जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रथमेश या तरुणाचा मृत्यू झाला.
रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला, मात्र मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू होताच, ट्रॉम्बे पोलिस स्टेशनने शोरमा विक्रेत्याविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. Chicken Shawarma
दरम्यान, शारमातील कोंबडी खराब झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दोन्ही विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती अधिकारी अमोल चाटे यांनी दिली आहे.