डिशमध्ये चिकनसोबत कोंबडीचं पीसही फ्री फ्री फ्री..! कॅफे गुडलक प्रकरणानंतर पुण्यातील ‘या’ हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर..


पुणे : पुण्यातील एक हॉटेलमध्ये किळसवाणा आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील एका हॉटेलमध्ये भयानक अस्वच्छता तर होतीच रण ग्राहकांन दिलेल्या जेवणातही स्वच्छतेच्या मानकांचे पालन न केल्याने त्यांचं आरोग्य धोक्यात आल्याची घटना उघड झाली आहे.

हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या ताटात कोंबडीचे पिस आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रदीप नाईक यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली असून, पुण्यातील हॉटेलमधील स्वच्छतेचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही घटना १६ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जवडी-मारुंजी रस्त्यावरील अरेबियन मंडी हॉटेलमध्ये घडली आहे. प्रदीप नाईक हे जेवणासाठी गेले असता, त्यांना हॉटेलमध्ये प्रवेशापासूनच अस्वच्छतेचा अनुभव आला.

पार्किंगची अव्यवस्था, अस्वच्छ जेवणाची जागा, तेलकट टेबल-खुर्च्या आणि अत्यंत खराब हात धुण्याची सोय असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर, नाईक ‘निजाम चिकन कबाब’ खात असताना त्यांच्या ताटात चक्क कोंबडीचे पिस आढळून आले, ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

त्यांनी तात्काळ मॅनेजरला बोलावून जाब विचारला असता, मॅनेजरने वाद टाळण्यासाठी “काही बोलू नका, बिल देऊ नका” असा सल्ला दिला. मात्र, नाईक यांनी हॉटेल प्रशासनाची ही भूमिका नाकारली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!