Chhota Rajan : मोठी बातमी! दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अजून जिवंत, अनेक वर्षांनी खरे फोटो आले समोर, फोटो जगभरात व्हायरल…
Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असल्याचे चित्र समोर आले आहे. जवळपास 8 वर्षांपासून तिहार तुरुंगात बंद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अजूनही दाऊद इब्राहिमला मारण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचे गुप्तहेर अजून दाऊदचा तपास करत असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत आता अंडरवर्ल्ड डॉनचे दोन फोटो समोर आले आहेत. यामध्ये एका फोटोमध्ये छोटा राजन रुग्णालयामधील कारागृहात आहे. त्याला 2020 मध्ये कोरोना झाला असताना रुग्णालयात दाखल असतानाचा हा फोटो आहे. तो मेला असल्याची देखील माहिती समोर आली होती. यामुळे ती अफवा असल्याचे आता पुढे आले आहे.
यातील दुसरा फोटो आताचा असल्याचे बोलले जात आहे. जवळपास नऊ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
यामुळे तो काहीही करू शकतो, अशी भीती त्याच्या दुष्मन असलेल्यांना आहे. छोटा राजनचा कोरोना काळात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती.
दरम्यान, सध्या छोटा राजन दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असून त्याला 2015 साली बाली विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्याला तिहार जेलमधील २ नंबरच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
यासाठी मोठी खबरदारी देखील घेतली जात आहे. तो जरी जेलमध्ये असला तरी त्याचे गुप्तहेर त्याची अनेक माणसे ही बाहेर कार्यरत असून त्याची टोळी सक्रिय असल्याचे देखील सांगितले जाते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.