‘छावा’ चित्रपट वादात अडकणार? ट्रेलर बघितल्यावर उदयनराजे यांचा थेट दिग्दर्शकाला फोन, म्हणाले, चित्रपटातील दृश्य…


पुणे : नुकताच ट्रेलर आल्यानंतर ‘छावा’ सिनेमा वादात अडकला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहेत, यावरून वाद सुरू झाला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विकी कौशल व रश्मिका मंदाना यांच्या भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहेत. यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फोन केला आहे. याबाबत त्यांनी माहिती घेतली आहे.

या नृत्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. त्यांना फोन करून उदयनराजे म्हणाले, तुम्ही चित्रपटाचं दिग्दर्शन खूप सुंदर केलं आहे. त्यातले एखाद दुसरे दृश्य जे आहे ते आपण इतिहास तज्ज्ञांना विचारात घेऊन केलं, तर आता कारण नसताना जी कॉन्ट्रोव्हर्सी होतेय ती थांबेल.

यानंतर लक्ष्मण उतेकर म्हणाले, चित्रपटामध्ये फक्त आपले राजे किती थोर होते, हेच दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे तज्ज्ञांना दाखवून जे काही बदल करायचे आहेत, ते आपण नक्की करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे चित्रपटात काही बदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच काही आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली असतील तर ती बदलून लोकांपर्यंत चांगला चित्रपट पोहोचावा. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी, धर्मासाठी केलेले योगदान हे चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर यावे, असेही उदयनराजे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही सिनेमाच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास जगभरात जाणार आहे. पण त्यांनी ट्रेलरमध्ये महाराज नृत्य करताना दाखविल्यामुळे ते लोकांना कितपट पटेल, याबाबत शंका वाटते, असे म्हटले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!