छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाईत ६ नक्षलवादी ठार, सुरक्षा दलांची मोठी कारवाई…


बिजापूर : सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली. चिकुरबत्ती- पुसबाकाजवळील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला केडरसह सहा नक्षलवादी ठार झाले आहेत.

यामुळे ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईत डीआरजी, सीआरपीएफ २२९ आणि कोब्राच्या पथकांचा सहभाग होता.
सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना बासागुडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत चिकुरबत्ती आणि पुसबाका गावांच्या जंगलात गोळीबार सुरू झाला.

यामुळे मोठा गोंधळ उडाला. जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि त्याची विशेष बटालियन कोब्रा यांच्याशी संबंधित सुरक्षा जवान या कारवाईत सहभागी झाले होते, याबाबत पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी. यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, ही चकमक थांबल्यानंतर घटनास्थळावर एका महिलेसह सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. या भागात अद्याप शोधमोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर याठिकाणी मोठा पोलीस फाटा हजर होता.

दरम्यान, सध्या बिजापूर जिल्ह्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यापूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!