Chhatrapati Shivaji Maharaj : लंडनच्या संग्रहालयातील ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच, डॉ प्रतापसिंह जाधव यांनी थेट पुरावा सांगितला


Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्यावेळी वापरलेली वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात आहेत. सध्या ती भारतात आणली जाणार असून यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे.

त्याची खातरजमा करण्यासाठी आपण स्वतः पाठवलेल्या पत्राला 1971 साली व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या वस्तुसंग्रहालयाकडून लेखी उत्तर देण्यात आले. त्यांनी सोबत दोन फोटो पाठवले. त्यामध्ये महाराजांच्या तलवारीसह ही वाघनखे इंडियन सेक्शनमध्ये फ्रेम 709, रूम नंबर 7 मध्ये असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. Chhatrapati Shivaji Maharaj

इतका स्पष्ट उल्लेख असताना परत त्या वाघनखांवर शंका उपस्थित करणे चुकीचे असल्याचे पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 1971 पासून आपण याविषयी सतत पाठपुरावा करत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांचेही याकडे लक्ष वेधल्याचे सांगत डॉ. जाधव यांनी अभ्यासाशिवाय कोणीही या विषयावर बोलू नये. महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला, तीच वाघनखे इंग्लंडच्या संग्रहालयात असल्याचा पुरावा आपल्याकडे आहे, असेही ते म्हणाले.

ही वाघनखे छत्रपती शिवरायांची आहेत याचा पुरेपूर पुरावा पुढारीकडे आहे. 1971 साली वि. ह. कोडोलीकर यांना आलेले पत्र, काशीराम रत्नसावंत तथा तात्यासाहेब देसाई यांनी ते पत्र आपल्याकडे दिले होते. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीबद्दलही उल्लेख करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!