छत्रपती संभाजीनगर हादरलं ; ‘ तु मला आवडतेस ,माझ्याशी बोल नाहीतर…’, नराधमाने गोठ्यात नेलं अन् विवाहितेसोबत केलं भयानक कृत्य……

छत्रपती संभाजीनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. असे असतानाच आता सिल्लोड तालुक्यातील 33 वर्षीय विवाहितेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रमेश शामराव जाधव (वय-36) असं त्या आरोपीचे नाव आहे.25 जुलैच्या रात्री पीडितेचा पती घरी नसताना, आरोपी रमेश जाधव मुलांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. त्यानंतर त्याने तिला घराशेजारील शेळ्यांच्या गोठ्यात बोलावले.’ तू मला आवडतेस,माझ्याशी बोल नाहीतर…. अशी धमकी दिली. आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने अजिंठा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी रमेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार धम्मदीप काकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान आरोपी हा पीडितेच्या ओळखीचा आहे. पीडितेचा पती घरी नसताना तो तिच्याकडे वारंवार येत असे. पती घरात नसल्याने 25 जुलै च्या रात्री त्यांने डाव साधत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.