Chhagan Bhujbal : नाराजी दूर होणार की बंड होणार!! छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी तीन नेते मैदानात, आजच निर्णय…

Chhagan Bhujbal : रविवारी महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यातच आता छगन भुजबळांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
यामुळे ते लवकरच बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. आता छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून गैरहजर असलेले अजित पवार हे आज विधिमंडळात दाखल होणार आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तिघे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी हे तिन्ही नेते भेट घेणार आहेत. या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नहाी. मात्र ही भेट नाशिकमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.