Chhagan Bhujbal : ब्रेकिंग! छगन भुजबळ मुंबईकडे रवाना, घेणार मोठा निर्णय? निर्णयाकडे राज्याचं लक्ष…


Chhagan Bhujbal : रविवारी महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे.

मात्र महायुती सरकारच्या झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना वगळण्यात आले आहे. मंत्रीमंडळात समावेश न झाल्यानं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भुजबळ थेट नागपुरचं हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकला रवाना झाले होते.

त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या. तसेच नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा देखील घेतला होता. त्यानंतर आज छगन भुजबळ हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते आता पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. Chhagan Bhujbal

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. ते नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद न साधताच भुजबळ मुंबईला रवाना झाले आहेत. भुजबळ उद्या आणि परवा राज्यातील तसेच देशातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांना भेटणार आहेत. भुजबळ पुढे काय निर्णय घेतात याकडं सर्वाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!