चेन्नई सुपर किंगने कोरले IPL वर आपले नाव, शेटवच्या बॉलवर जिंकला सामना..


नवी दिल्ली : काल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला आहे.

यावेळी मोठा चुरशीचा सामना झाला. शेवटच्या दोन बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना एक षटकार आणि एक चौकार जडेजाने मारला. यामुळे तो या सामन्याचा हिरो ठरला. यामुळे आयपीएल स्पर्धेतील विजेतेपदावर चेन्नई सुपर किंग्सचे पाचव्यांदा नाव कोरले गेले आहे.

काल झालेल्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यात आली. यावेळी वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल या खेळाडूंनी चांगली सुरुवात करून दिली होती.

चेन्नईने विजय मिळवल्यामुळे यामुळे सीएसकेच्या चाहत्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. गुजरातच्या चाहत्यांची मात्र यावेळी निराशा झाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!