पुणेकरांनो सावधान! पिंपरी चिंचवडमधून 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त ; अन्न व सुरक्षा विभागाची मोठी कारवाई


पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमधील महाराष्ट्र मिल्क डेअरीवर खंडणी विरोधी पथक आणि अन्न व सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी छापे टाकले. यामध्ये 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त करण्यात आलं आहे.

यामुळे पुणेकर केमिकलयुक्त पनीर खात नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुधाच्या पावडरमध्ये ॲसिटिक ॲसिड टाकून अतिशय गलिच्छ पद्धतीने हे पनीर तयार केलं जात होतं. मागील अनेक वर्षांपासून हा उद्योग सुरू होता.

ही बाबदेखील तपासात समोर आली आहे. या प्रकरणी डेअरीचा मालक साजिद मुस्तफा शेखसह अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या आरोग्यासोबत खेळ केला जात असल्याचं समोर आलं आहे.

जर पनीरचा रंग निळा झाला असेल तर ते भेसळयुक्त आहे. भेसळयुक्त पनीर खाणं टाळा, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अशा रितीने तुम्ही पनीर भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखू शकता. शुद्ध पनीर मऊ असतं.

पण तुमचं पनीर घट्ट असेल तर ते भेसळयुक्त आहे, हे समजून घ्या. आपल्यातील अनेकांचा पनीर हा अतिशय आवडीचा पदार्थ असतो. घरी काही खास सण किंवा स्पेशल दिवस असला की बहुतेक घरांमध्ये पनीर बनवलं जातं आणि मोठ्या आवडीने खाल्लंही जातं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!