थर्टी फर्स्टला पहाटे 5 वाजेपर्यंत जल्लोष!हॉटेल, वाईन शॉप आणि बार किती वाजेपर्यंत? सरकारचा मोठा निर्णय

पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागरिकांपासून हॉटेल व्यवसायिकांनाही राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिलं आहे.सरकारने २४, २५, ३१ डिसेंबर रोजी बार, वाईन शॉप्स, परमिट रूम, बीअर बार यांना पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहेत.

राज्यात नाताळ आणि थर्टी फर्स्टचा फिव्हर पाहायला मिळत असतानाच, गृह विभागाने मद्यविक्रीच्या वेळेत मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. २४, २५ आणि ३१ डिसेंबर या तीन दिवशी राज्यातील बार आणि मद्यालये निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ सुरू राहणार आहेत. त्यामुळे आता थर्टी फर्स्ट पहाटे पाच वाजेपर्यंत गाजणार आहे.

२०२५ या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. अशातच नाताळ आणि थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करणाऱ्या नागरिकांसाठी आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी राज्य सरकारने गिफ्ट दिल आहे.गृह विभागाने विशेष आदेश जारी करत २४, २५ आणि ३१ डिसेंबर या तीन महत्त्वाच्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने आणि बारच्या वेळेत मोठी शिथिलता दिली आहे.

यामुळे आता सेलिब्रेशनचा उत्साह रात्री उशिरापर्यंत टिकून राहणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार, विविध प्रकारच्या परवान्यांसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. या सवलतीमुळे हॉटेल आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
शासनाने ही सवलत दिली असली, तरी स्थानिक पातळीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
जर एखाद्या जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असेल, तर संबंधित जिल्हाधिकारी या सवलतीच्या वेळेत कपात करू शकतात, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाईन शॉप्स आणि रिटेल विक्री: साधी विदेशी मद्य विक्री दुकाने (FL-2): रात्री १०:३० ऐवजी आता मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहतील.
Premium FL-2: रात्री ११:३० ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत विक्री करू शकतील.
वाईन आणि बिअर रिटेल शॉप्स: यांनाही मध्यरात्री १ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
वाईन शॉप्स आणि रिटेल विक्री: साधी विदेशी मद्य विक्री दुकाने (FL-2): रात्री १०:३० ऐवजी आता मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहतील.
Premium FL-2: रात्री ११:३० ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत विक्री करू शकतील. वाईन आणि बिअर रिटेल शॉप्स: यांनाही मध्यरात्री १ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
परमिट रूम आणि क्लब (FL-3 / FL-4): पोलीस आयुक्तालय क्षेत्र मुंबई, पुणे, ठाणे परमिट रूम आता रात्री १:३० ऐवजी थेट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. इतर क्षेत्रे येथेही रात्री ११:३० नंतर सवलत देत पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
बिअर बार (Form E / E-2): बीअर बार मालकांना आता मध्यरात्री १२ नंतरही आपले व्यवसाय सुरू ठेवता येतील. त्यांना पहाटे ५ वाजेपर्यंत ग्राहकांना सेवा देण्याची मुभा असेल.
देशी दारू दुकाने (CL-3) महानगरपालिका आणि ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रांत रात्री ११ ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात आली आहे.इतर ग्रामीण भागात रात्री १० ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील
