पुण्यात मोठं कांड!! केकचं आमिष दाखवून फसवले, मुलानं आईच्या अकाऊंटमधून ट्रान्सफर केले 9 लाख अन्…


पुणे : पुण्यातील भोसरी परिसरात एका मुलाला लुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच यात कटरचा धाक दाखवून आणि त्याच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल ९ लाख ४१ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दिघी रोडवरील बन्सल सिटी सोसायटीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीच्या मुलाला महागडे घड्याळ आणि केकचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले.

तसेच एकदा मुलगा जाळ्यात अडकल्यानंतर आरोपींनी आपले खरे रूप दाखवले. आरोपींनी मुलाला कटरचा धाक दाखवून जर पैसे दिले नाहीत, तर तुझ्या आई-वडिलांना जीवे मारू, अशी भीती घातली.

वेळोवेळी ट्रान्सफर केले पैसे…

पालकांच्या जीवाच्या भीतीने धास्तावलेल्या मुलाने घरच्यांच्या नकळत मोबाईलचा वापर केला. त्याने आईच्या बँक खात्यातून ६ लाख ६१ हजार रुपये आणि आजोबांच्या खात्यातून २ लाख ८० हजार रुपये असे एकूण ९ लाख ४१ हजार रुपये आरोपींच्या खात्यावर वेळोवेळी ट्रान्सफर केले. मोठ्या रकमा गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी दिघी पोलिसांनी आशु शैलेश खंडारे (१९, रा. बन्सल सिटी) आणि ओमकार आवारे (रा. संत तुकाराम नगर) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, या धक्कादायक आणि अजब घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!