तुळापूर परिसरातील वाहतुकीत बदल

पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ तुळापुर गाव येथे वाहतुक सुरक्षीत व सुरळीत राहणेकरीता मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(ए)(बी), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, वाहतुक, पुणे शहर हे अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन आवश्यकतेनुसार लोणीकंद वाहतुक विभागातंर्गत दि. २८ मार्च २०२५ रोजी रात्री १०:०० ते दि. २९ मार्च २०२५ रोजी रात्रौ १२:०० वा. पर्यंत तुळापुर परिसरातील मार्गावर डंपर, मिक्सर, टिपर व सर्व मल्टी एक्सेल, जड वाहनांच्या वाहतूकीत खालीलप्रमाणे बदल करीत आहेत.
पेरणे फाटा, मरकळ मार्गे, आळंदी पिंपरी चिंचवड कडे जाणाऱ्या जड वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
मरकळ नदी पुलामार्गे तुळापुरकडे येणाऱ्या जड वाहनांना पुलाच्या पुढे प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
तुळापुर फाटा मार्गे आळंदी, पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या जड वाहनांना तुळापुर फाट्याच्या पुढे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
वाघोली, भावडी येथून तुळापुरकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी करण्यात येत आहे.
जगताप डेअरी कडून थेऊर फाटा, तुळापुर फाटा, पेरणे फाट्याकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
सोलापुर रोड खंडोवाचा माळ, थेऊर फाट्याकडून लोणीकंद थेऊर फाटा मार्गे तुळापुर फाटा मरकळकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे, असे पोलीस उप-आयक्त वाहतुक पुणे शहर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.