शिष्यवृत्ती परीक्षेत बदल! शिक्षण विभागाकडून महत्त्वाचा जीआर जारी, घेण्यात आला मोठा निर्णय…

पुणे : राज्यातील शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्त्वाचा जीआर जारी केला आहे. या अंतर्गत आता पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचव्या ऐवजी इयत्ता चौथीसाठी तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी ऐवजी सातवीच्या वर्गांसाठी घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या अनुषंगाने शिष्यवृत्ती परीक्षा 1954- 55 पासून आयोजित करण्यात येत आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे.सुरुवातीला चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी स्कॉलरशिप परीक्षा आयोजित करण्यात येत होती. परंतु मध्यंतरी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप चेंज करण्यात आले.ही परीक्षा पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाचा थोडासा नकारात्मक प्रभाव दिसून येत आहे.

दरम्यान 2016- 17 पासून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याआधी चौथी आणि सातवीच्या वर्गासाठीच स्कॉलरशिप परीक्षा घेतली जात होती. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा प्रभाव फारच व्यापक राहिला आहे.
नुकताच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून आज अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावर्षी चौथी आणि सातवी सोबतच पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.

अर्थात यावर्षी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी आणि सातवीच्या वर्गासाठीच शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.
