महत्वाची बातमी! राज्यातील हवामानात बदल, २०, २१ आणि २२ फेब्रुवारीला पावसाचा इशारा, कुठे बरसणार? जाणून घ्या

पुणे : मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उन्हाचा चटका आता जाणून लागला आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून सकाळच्या वेळी थोडासा गारठा जाणवतो. मात्र, राज्यातून थंडी गायब झाली ही वस्तूस्थिती असली तरीही प्रदूषण काही कमी होण्याचे नाव घेत नाही.

या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग यांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागांत हलक्या सरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागील आठवड्यापासून थंडीचा प्रभाव कमी झाला असून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. सकाळी किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत आहे. हवामानातील या सततच्या बदलामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या देखील डोके वर काढताना दिसत आहेत.

खबरदारी घेण्याचे आवाहन…
हवामानातील बदल आणि प्रदूषण यांचा दुहेरी परिणाम आरोग्यावर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, तापमानातील चढ-उतारामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
IMD च्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. जेऊर येथे १४.५ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आले. दिवसभर तापमानात चढ-उतार होत असल्याने हवामानाचा अंदाज सतत बदलताना दिसत आहे.
काही भागात थंडी, काही ठिकाणी उन्हाचा चटका…
दरम्यान, २२ फेब्रुवारी रोजी केरळ आणि तामिळनाडू येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिमाचल प्रदेश मध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हंगामी स्वरूप पाहायला मिळत असून काही भागात थंडी, काही ठिकाणी उन्हाचा चटका तर काही राज्यांत पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.