मोठी बातमी! उत्तरपत्रिकांत हस्ताक्षरामध्ये बदल, विद्यार्थ्यांना नोटीस, शिक्षण क्षेत्रात खळबळ…!
पुणे : शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीची परीक्षा काही दिवसांपूर्वी झाली आहे.
असे असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षरांमध्ये बदल असल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी 552 विद्यार्थ्यांना बोर्डाने नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यामध्ये उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षर बदल आणि कथित गैरप्रकारांवर बोर्डाच्या कार्यालयात सुनावणी सुरू झाली. यामध्ये उत्तर इतर कोणीतरी लिहिली असल्याचे सांगितले आहे. यामध्ये चौकशी समितीने विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले.
विद्यार्थ्यांनुसार, काही उत्तरपत्रिकांत एका ओळीत हस्ताक्षर बदल होता तर काहींत तीन ओळीत. विद्यार्थ्यांनी लेखीमध्ये हा प्रकार स्पष्ट नाकारल्याने एवढ्या उत्तरपत्रिकांत रिकाम्या जागी उत्तरे लिहिली कुणी, असा प्रश्न सध्या समोर आला आहे.