चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन ! वडीलांच्या तीन दिवसांपूर्वी निधनानंतर धानोरकरांची एक्झिट…!

नवी दिल्ली : चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते काॅंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते. त्यांच्या पत्नीही आमदार असून या दांपत्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न उपस्थित केले.
त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी दीड वाजता आणण्यात येणार आहे, येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१ मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. गेल्या तीन दिवसांपूर्वीच खा. धानोरकर यांच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीत एअरलिफ्ट करण्यात आले होते.
Views:
[jp_post_view]