मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय!! थेट महाविद्यालयात जाऊन…

पुणे : महायुती सरकारने काही महिन्यांपूर्वी शिक्षणात मुलींच्या फी माफीचा निर्णय घेतला होता. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला होता. मात्र याबाबत नंतर अनेक ठिकाणी फी घेतल्याचे समोर आले. यामुळे आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट दिली.

यावेळी त्यांनी मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने व्यवसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती.
असे असले तरी याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे की नाही, तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणीतील शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने दिशानिर्देश देखील जारी केले होते. याबाबत भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती. याबाबत कोणी वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत.

याचा आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गरवारे महाविद्यालयास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी थेट महाविद्यालयामधील विद्यार्थिनींशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. पैशांमुळे अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागते.
त्यामुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने मुलींचे व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षण पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुलींनी देखील ३१ मार्चपर्यंत महाविद्यालयात शासनाने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फी माफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशी सूचना यावेळी केली. यामुळे याचा मुलींना नक्कीच फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात मुलींना शिक्षणात काही अडचण येणार नाही.