Chandrakant Patil : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन..
Chandrakant Patil पुणे : कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.विकासचंद्र रस्तोगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर, शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, डॉ.गजानन एकबोटे, माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर आदी उपस्थित होते. Chandrakant Patil
नूतन कार्यालयाच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक कार्यक्षमपणे काम होईल असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
मॉडेल कॉलनी येथील पूर्वीच्या तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करून तेथे उच्च शिक्षण संचालनालय कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे.
Views:
[jp_post_view]