मोठी बातमी! राज्यातील ‘या’ भागात येत्या ३-४ तासांत पाऊसाची शक्यता ; हवामान विभागाचा इशारा…!

पुणे : राज्यातील काही भागात पुढील तीन-चार तासात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने येत्या दोन दिवस पाऊस पडणार आल्याचा अंदाज वर्तविला होता. यापार्श्वभूमीवर आता उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या ४ तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.


कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. कोल्हापूर, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, येत्या तीन ते चार तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.