लोणी काळभोर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या उरुळी कांचन येथील तस्करास बेड्या, ३६ लाखाचा माल जप्त
उरुळी कांचन : लोणी काळभोर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणार्याला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एमडी, बंटा गोळ्या आणि इतर ऐवज असा एकुण ३६ लाख ४६ हजार २०० रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
जितेंद्र सतीशकुमार दुवा (वय. ४०, सध्या रा. ड्रीम्स निवारा सोसायटी, ऊरळीकांचन, पुणे मुळ रा. दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक- 1 कडील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार विशाल शिंदे आणि योगेश मोहिते यांना आरोपी हा प्रयागधाम ट्रस्ट हॉस्पीटल शेजारी असलेल्या बस स्टॉप येथील सार्वजनिक रोडवर अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील झडतीमध्ये एमडी आणि बंटा गोळ्या आढळून आल्या. पोलिसांनी अंमली पदार्थासह रोख रक्कम, 3 मोबाईल फोन, वेरना कार असा एकुण ३६ लाख४६ हजार २०० रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार , सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, पोलिस अंमलदार विशाल शिंदे, पोलिस योगेश मोहिते, पोलिस मारूती पारधी, पोलिस सुजित वाडेकर, पोलिस मनोजकुमार साळुंके, पोलिस पांडुरंग पवार, पोलिस ज्ञानेश्वर घोरपडे, पोलिस प्रविण उत्तेकर, पोलिस विशाल दळवी, पोलिस संदिप शिर्के, पोलिस राहुल जोशी, पोलिस संदेश काकडे, पोलिस नितेश जाधव, पोलिस सचिन माळवे आणि महिला पोलिस अंमलदार रेहाना शेख यांच्या पथकाने केली आहे.