होळीआधी मध्य रेल्वेचं गिफ्ट! पुण्यातून नागपूरसह ‘या’ शहरांसाठी स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक…

पुणे : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कामानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेले नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी परततात.

दरम्यान, या काळात रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने होळी उत्सवानिमित्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या विशेष गाड्या धावणार आहेत.
पुण्यातून सुटणाऱ्या दानापूर, गोरखपूर, नागपूर आणि हजरत निजामुद्दीन या मार्गांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण 18 फेब्रुवारीपासून ऑनलाइन चालू होणार आहे.

पुण्यातून गोरखपूर आणि दानापूरकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे–गोरखपूर मार्गावर 32 दैनिक विशेष फेऱ्या, पुणे–दानापूर मार्गावर 32 दैनिक विशेष फेऱ्या तसेच पुणे–दानापूर दरम्यान 8 द्वि-साप्ताहिक विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
पुणे-नागपूर प्रवास सोपा..
पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 01461 ही 24 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दुपारी 1.50 वाजता पुण्यातून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01478 ही 25 फेब्रुवारी आणि 4 मार्च रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री सुमारे 11.30 वाजता पुण्यात दाखल होईल.
पुणे-नागपूर प्रवास सोपा..
पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 01461 ही 24 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दुपारी 1.50 वाजता पुण्यातून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01478 ही 25 फेब्रुवारी आणि 4 मार्च रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री सुमारे 11.30 वाजता पुण्यात दाखल होईल.
पुणे–दानापूर विशेष गाडी…
पुणे–दानापूर द्वि-साप्ताहिक गाडी क्रमांक 01449 ही 21 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान दुपारी 3.30 वाजता पुण्यातून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे सुमारे 2.45 वाजता दानापूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01450 ही 23 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान सकाळी 5 वाजता दानापूरहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 6.15 वाजता पुण्यात दाखल होईल.
पुणे–दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी जाहीर..
पुणे–दानापूर दरम्यान द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 01481 ही 23 व 27 फेब्रुवारी तसेच 2 व 6 मार्च रोजी सायंकाळी 7.55 वाजता पुण्यातून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 4.20 वाजता दानापूरला पोहोचेल.
परतीसाठी गाडी क्रमांक 01482 ही 25 फेब्रुवारी तसेच 1, 4 व 8 मार्च रोजी सकाळी 8 वाजता दानापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.15 वाजता पुण्यात दाखल होईल. या अतिरिक्त फेऱ्यांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.