राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. गेल्या महिन्यात अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. सर्व नेत्यांसाठी खातेवाटप देखील करण्यात आलंय.

पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. याच फुटीमध्ये जे दोन गट पडले आहेत त्यापैकी एका गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

अजित पवार गटाच्या याचिकेवर भूमिका मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पक्ष नक्की कुणाचा याबाबत निवडणूक आयोगात याचिका सुरु होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!