जागतिक नोबेल पुरस्कार वितरण दिनी म्हणजे १० डिसेंबर रोजी देशात संशोधन अथवा शास्त्रज्ञ दिन साजरा करा; रँचो आणि डिकाईचे संस्थापक रघुनाथ यमुल गुरुजी यांची पंतप्रधानांकडे महत्त्वाची मागणी….


पुणे : ‘रिसर्चर्स अँड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन’ (रँचो) आणि दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCAI) तर्फे देण्यात येणारा युवा संशोधक सर सी. व्ही. रमण पुरस्कार संशोधक विक्की मोदी आणि वैज्ञानिक व टोर्चिट चे हनी भगचंदानी यांना प्रदान करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते दिनेश के. भाल, रँचो आणि डिकाईचे संस्थापक व चेअरमन रघुनाथ येमुल गुरुजी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित अग्रवाल यांच्या हस्ते हा सन्मान झाला. दिव्यांग, संशोधन, नवोन्मेष आणि सहाय्यक तंत्रज्ञान क्षेत्रात दोघांनीही केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

पुरस्कारार्थींनी समाजातील वंचित आणि दिव्यांग घटकांसाठी रघुनाथ येमुल गुरुजी करत असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. “धडधाकट लोकांना कोणी विचारत नाही, अशा वेळी दिव्यांगांना कोण विचारणार हा मोठा प्रश्न आहे; मात्र डिक्काईच्या माध्यमातून दिव्यांगांना ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचे कार्य प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

रँचो आणि डिक्काई चे संस्थापक रघुनाथ येमुल गुरुजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून १० डिसेंबर हा दिवस ‘संशोधक दिन किंवा शास्त्रज्ञ दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. संशोधन ही वर्षानुवर्षांची तपश्चर्या, त्याग आणि संघर्षातून घडणारी प्रक्रिया असून समाजातील प्रत्येक सुविधा आणि तंत्रज्ञानामागे संशोधकांचे योगदान असते, याची जाणीव करून देण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. चिल्ड्रन्स डे, फादर्स डे, मदर्स डे असे विविध दिवस साजरे होत असताना संशोधकांचा गौरव करण्यासाठी असा दिवस असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येमुल गुरुजींनी सांगितले की १० डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार वितरित केले जातात आणि १९३० मध्ये याच दिवशी भारताचे शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच २१ नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन असल्याने या दोन तारखांपैकी एक दिवस ‘संशोधक दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संशोधक आणि नवोन्मेषक हे भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे आधारस्तंभ असून शिक्षक दिन, डॉक्टर्स डे आणि इंजिनीअर्स डे प्रमाणे संशोधक दिन साजरा झाल्यास विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

रँचोचा ‘रिसर्च इंडिया रिसर्च’ हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी राबवला जात आहे. वैज्ञानिक मॉडेल्स, सादरीकरणे आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून संशोधनाची प्रेरणा दिली जाते. उद्योगपती व संशोधकांच्या सहभागातून ज्ञानवृद्धी साध्य करण्याचे उद्दिष्ट रँचोने ठेवले आहे. समाजाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याच्या जोरावर १० डिसेंबर हा दिवस जागतिक स्तरावर ‘संशोधक दिन’ म्हणून साजरा व्हावा, असे आवाहन संस्थेने केले.

डिक्काई तर्फे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून १० डिसेंबर रोजी संशोधक दिन साजरा करण्यात आला. संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला असून केंद्र व राज्य शासनाला याबाबत अधिकृत मान्यतेसाठी पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. संशोधक आणि शास्त्रज्ञ हे समाजाच्या प्रगतीचे मूलभूत घटक असल्याने त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होणे अत्यावश्यक असल्याचे येमुल गुरुजींनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!