सत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्यांच्या घराची सीबीआयकडून झडती, मोदींविरोधात केली होती वक्तव्य
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घराची सीबीआयकडून झडती घेण्यात आली आहे. त्यांनी अनेकदा भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. असे असताना आता सत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्यांच्या घराची सीबीआयकडून झडती सुरू आहे.
कथित विमा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात सीबीआयकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी सीबीआय जम्मू-काश्मीर आणि दिल्लीत नऊ ठिकाणी शोध घेत आहे.
सत्यपाल मलिक यांना २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बनवण्यात आले होते. मात्र यानंतर अनेकदा वाद निर्माण झाला होता. अनेकदा त्यांनी मोदींवर टीका केली होती. मोदींसह अमित शहा यांच्यावर देखील त्यांनी टीका केली होती.
Views:
[jp_post_view]