नवाबमालिकांना अडचणीत आणणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचे छापे!

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान यांना ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. यानंतर आयआरएस अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. आता यांच्याच घरावर सीबीआयने छापा टाकला गेला आहे.

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याच्या मुंबईतील घराच्या परिसराची य़ंत्रणेकडून झाडाझडती घेण्यात आली.
वानखेडे यापूर्वी एनसीबीचे मुंबई झोनचे प्रमुख अधिकारी होते. सिनेअभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन याला अटक केल्यामुळे ते वादात भोवऱ्यात होते. आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत.

दरम्यान, समीर वानखेडे एनसीबीमध्ये अधिकारी असताना त्यांनी आर्यन खानला अटक केली होती. यावेळी ते एनसीबीचे प्रमुख अधिकारी होते. तेव्हापासून ते चर्चेत आले आहेत.
Views:
[jp_post_view]