हिंदू मुलींना धरा, जी भेटेल तिला…!!लव्ह जिहादचा धक्कादायक कट? गरब्यात हिंदू मुली टार्गेटवर..

पुणे : विरारच्या विवा कॉलेजमध्ये नवरात्री निमित्त सुरू असलेल्या गरब्यात येणाऱ्या मुलींवर दोन (मुस्लीम) तरुणांनी सोशल मीडियावर केलेल्या अश्लील चॅटमुळे खळबळ उडाली आहे.

या चॅटमध्ये “एकही हिंदू मुलगी सोडू नका” तसेच इतर अश्लील आणि वादग्रस्त वाक्यांचा समावेश आहे. या आक्षेपार्ह चॅट प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आक्षेपार्ह चॅट करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

काय आहे त्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये?

या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दोन तरुणांचं संभाषण आहे. यामध्ये ते मुलींसोबत शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत आहे. जी हिंदू मुलगी दिसेल तिच्याशीwh जवळीक कर असा सल्ला या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी मुलींना कॉलेजमधील कुठला मजला निर्मनुष्य असेल याचाही या चॅटमध्ये उल्लेख आहे. या चॅटमध्ये अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे.

या घटनेला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी थेट ‘लव्ह जिहादचा कट’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गरबा केवळ हिंदूसाठीच असा पवित्रा भाजपने घेतला आहे.
चॅट व्हायरल होताच, कॉलेज प्रशासनाने तत्काळ पाऊल उचलले. विवा कॉलेज प्रशासनाने बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने कारवाई करत आक्षेपार्ह चॅट करणाऱ्या दोन आरोपींपैकी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस तपासात होणारे पुढील खुलासे या प्रकरणाचे खरे स्वरूप समोर आणतील. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून महिला व मुलींच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
