उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर टेम्पो पलटी करणाऱ्या बेधुंद टेम्पो चालकावर गुन्हा दाखल; पोलिसांनी समयसूचकता दाखवून कारवाई…
उरुळी कांचन : उरुळी कांचन – शिंदवणे रस्त्यावर बेधुंद चालकाने स्टेअरींगवर दारुचे घुटके घेऊन अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल ग्रँड नाईन समोर रविवारी (ता.०२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. याप्रकणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोश रामा गायकवाड (वय. २९ रा. कामतवाडी, कासुर्डी टोलनाक्याजवळ ता दौंड जि पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी रमेश सोमनाथ भोसले, वय.४८वर्षे , सहा पोलीस फौजदार, नेमणुक उरुळी कांचन पोलीस स्टेशन जि. पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल ग्रॅण्ड नाईन समोरून पालक भाजी घेऊन टेम्पो चालक नामे संतोश रामा गायकवाड
यांचा टेम्पो टे आर. टी. ओ पासींग नंबर एम एच ४२ वी 3317 हा हयगयीने अविचाराने भरधाव वेगात चालवुन रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पोवरील ताबा सुटुन टेम्पो पलटी होवुन अपघात झाला .
यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व जखमींना बाहेर काढले. त्यानंतर कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून सर्व जखमींना उरुळी कांचन येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी मंजु खराडे या महिलेला गंभीर दुखापत झाली.