मोठी बातमी! आमदार निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

सिंधुदुर्ग : निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. निलेश राणे यांनी भाजप नेत्याच्या घरात धाड टाकला होता यावेळी २५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली होती.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर निलेश राणे यांनी छापा टाकला होता. या छाप्यामध्ये २५ लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्यामुळे सिंधुदुर्गमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
निलेश राणे यांनी भाजप नेत्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमधील वाद शिगेला गेला. निलेश राणेंच्या आरोपांनंतर नितेश राणे हे देखील आक्रमक झाले होते. कोकणात दोन्ही राणे बंधू आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणे यांनी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर धाड टाकली होती. या कारवाईदरम्यान तब्बल २५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आल्यानंतर परिसरात तसेच राजकीय पातळीवर खळबळ माजली होती.

या घटनेनंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद अधिक चिघळला. निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. परिणामी, कोकणातील राजकारणात दोन्ही राणे बंधू आता एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे. या प्रकरणामुळे आगामी राजकीय घडामोडींमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
