शिक्षिकेचा पाठलाग करुन तिला मारहाण करुन विनयभंग प्रकरण! शाळेच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल, मांजरी येथील घटना…

पुणे : शाळेतील नोकरी सोडली असतानाही पाठलाग करुन लज्जास्पद वर्तन करुन महिलेला मारहाण करुन जीमारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच धमकी देणार्या शाळेच्या संस्थाचालकावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
त्याचवेळी या शिक्षिकेसह इतरांनी रात्री उशिरा शाळेत येऊन मारहाण करुन शाळेच्या खिडकीची काच फोडल्याची या संस्थाचालकाने तक्रार दिली आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी चैतन्य गुलाब लांडगे (वय. ३६, रा. लोणी काळभोर) आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथे शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, चैतन्य लांडगे यांची मुक्ताबाई गुलाब लांडगे एज्युकेशन सोसायटी या नावाने शिक्षण संस्था आहे. संस्थेची मांजरीतील मोरे वस्तीत केंब्रीज इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल या नावाने शाळा आहे. ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शाळेतील शिक्षिकेने काम सोडले आहे.
त्याचा राग मनात धरुन फिर्यादी महिला घरी जात असताना त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन चैतन्य लांडगे याने अश्लिल बोलून आपल्याकडे ओढले. त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले. हाताने गालावर व डोळ्याजवळ मारहाण करुन जखमी केले. काही मुलांना बालावून तुम्हाला जीवे मारतो, अशी धमकी दिली. पोलिसांनी चैतन्या लांडगे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत चैतन्य लांडगे यानेही हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चार महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केंब्रीज इंटरनॅशनल स्कुल येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.
तसेच लांडगे याच्या तक्रारीनुसार त्यांच्या शाळेत काम करणार्या शिक्षिका या पालकांना भेटून शाळेतून नाव कमी करण्यास सांगतात. तसेच शाळेत मद्रासचे शिक्षण दिले जाते, असे अपप्रचार करत आहे. म्हणून शाळेच्या महिला प्राचार्य या पालकांच्या घरी जाऊन गैरसमज दूर केला.
या घटनेबाबत या शिक्षिका रात्री ८ वाजता शाळेसमोर येऊन शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. लांडगे याने या शिक्षिकांच्या पतीला फोन करुन त्यांच्या पत्नीला समजावून सांगण्यास सांगितले. त्यानंतर या महिला निघून गेल्या. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता या शिक्षिका पतीसह परत शाळेत आल्या . त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ केली.
त्यातील महिला व तिच्याबरोबरच्या एकाने दगड मारुन शाळेच्या खिडकीची काच फोडली. एका महिलेने आपल्या थोबाडीत मारली, असे लांडगे याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करीत आहेत.