ब्रेकिंग! ठाकरे गटातील बडा नेता पुन्हा अडचणीत, संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल…!

नाशिक : ठाकरे गटावर एकामागून एक अशी संकटे येताना दिसत आहेत. आता काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. आता त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यापुढील टेन्शन अजूनच वाढले आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला गेल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा आहे.
याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी तक्रार दिली होती.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल चाटूगिरी असा शब्द वापरला होता. यामुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे. राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. तक्रारीत एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्याचे म्हटले आहे.