बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांच्यावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल…! 


पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह २० ते २५ जणांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

याप्रकरणी एका लिंबू विक्रेत्या महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

गेल्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या आवारातील बेकायदा फळ विक्रेते तसेच लिंबू विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई केली.

 

 

 

तसेच फळबाजारात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या लिंबू विक्रेत्यांनी कारवाईच्या निषेधार्थ मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते.

 

 

 

दरम्यान, त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार मधुकांत गरड, फळबाजार विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, संभाजी काजळे, अमोल घुले यांच्यासह २० ते २५ जणांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!