कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल, नियमांचे पालन न केल्याने अडचणीत वाढ…


संभाजीनगर : अनेकदा वादात अडकत असलेले कालीचरण महाराज आता पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. कालीचरण महाराज यांच्या आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या एका हिंदू जनजागरण सभेत बोलताना कालीचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल. असे वक्तव्य केल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे.

कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी फिर्यादी होऊन या तक्रार दिल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कालीचरण महाराज यांनी या सभेत भडकावू भाषण केले, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. यासह इतर आयोजकांच्या नियम आणि अटींचे पालन त्यांनी केले नसल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे भाजपचे शहराध्यक्ष यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!