एका लाखात कार तर 15 हजारात बाईक!! बँकेने ओढून आणलेल्या नव्या कोऱ्या गाड्यांची खरेदी करा, होईल फायदाच फायदा, जाणून घ्या…


सध्या बाईक आणि कारच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे पैशांचे बजेट बघून अनेकजण माघार घेतात. आता चारचाकी आणि दुचाकी वाहने अगदी तुमच्या बजेटमध्ये म्हणजेच चारचाकी वाहने 1 लाखात आणि बाईक किंवा स्कुटी तुम्ही 15 ते 20 हजारात खरेदी करु शकणार आहात. ते कसे जाणून घ्या.

बँका जेव्हा वाहन खरेदीसाठी कर्ज देतात तेव्हा त्या बँकाचे कर्ज फेडू न शकलेल्या लोकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा बँका लिलाव करतात. या लिलावात गाड्यांची किंमत अगदी कमी म्हणजे खऱ्या किमतीच्या फक्त 3% इतकी असते. यामुळे याच्या किमती खूपच कमी होतात.

एखाद्या चारचाकी कारची किंमत ही 10 लाख असेल तर बँकांच्या लिलावात तीच कार तुम्हा 30% कमी रकमेत 3 लाखाला खरेदी करता येते. पण त्यासाठी बँकांचा लिलाव कधी असतो ते माहिती असणे गरजेचे आहे. जर लिलाव झाला तर तुम्ही नंतर पुढच्या लिलावाचीच वाट बघू शकता.

त्या लिलावात सहभागी होऊन गाड्या खरेदीसाठी अनामत रक्कम भरणे गरजेचे असते. तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास सर्वप्रथम तुम्ही सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांच्या वेबसाईटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या वेबसाईटच्या माध्यमातूनच बँका त्यांच्या वाहन लिहालावाची तारीख जाहीर करतात.

काही वेळेस वाहनांच्या रकमांची देखील प्रत्यक्ष जाहिरात केली जाते. दरम्यान, बँकेच्या लिलावातून तुम्ही खरेदी केलेल्या गाड्यांच्या कागदपत्रांची पुर्तता तुम्हाला तिथेच लिलावात करुन घेणे आवश्यक आहे. ती गाडी तुम्ही लिलावात खरेदी केली आहे यासंबंधी बँक एक सर्टिफिकेट तुमच्या नावाने जाहीर करते.

यामुळे लिलावात खरेदी केलेली चारचाकी किंवा दुचाकी तुमच्या नावे करण्यासाठी तुम्हाला फायदा होतो. यामुळे अशा पद्धतीने तुम्ही गाडी खरेदी करू शकता, तसेच तुम्ही पैसे वाचवू शकता. येणाऱ्या काळात तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!