मोठी बातमी! नीरा देवघर धरणात कार कोसळली, एकजण सापडला, तर तिघांचा शोध सुरु…


पुणे : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत. आता पुण्याहून वरंदा घाटमार्गे महाडला जाणारी कार निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली. यामुळे बचावकार्य सुरु आहे.

या कारमधील ४ जण होते. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले आहे. गाडीतील ३ जण बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध सध्या घेतला जात आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील ही कार भोरहून पुढे वरंदा घाटातून जात होती. धुके आणि पाऊस यामुळे चालकाला रोडचा अंदाज आला नाही. यामुळे ही घटना घडली आहे.

ही कार कठडा तोडून घाटातून निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली. कारमधील एक जण बाहेर आला आहे. भोर पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. तिघांचा शोध सुरु आहे.

पावसामुळे मात्र शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. याबाबत याठिकाणी अनेकजण बचावकार्य करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!