धक्कादायक! नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; चार ठार, एक जखमी..


लातूर : नांदेडहून तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना, ऊसाच्या ट्रॅक्टरला कारची जोराची धडक बसून चौघे जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना नांदेड महामार्गावर महाळंग्रा शिवारातुन समोर आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके, नर्मन कात्रे अशे या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौघेही तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कारने शनिवारी रात्री निघाले होते. ते महाळंग्रा शिवाराजवळ पोहोचले असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून जोराची धडक दिली.

कार नर्मन कात्रे चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रॅक्टरला मागून जोराची धडक बसली. यात नर्मनसह मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून शुभम लंकाढाई हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लातूरमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!