धक्कादायक! मुळा -मुठा व भिमानदींच्या काठावरील भागात कॅन्सरचा विळखा वाढतोय! कॅन्सर तज्ञ मंडळींनी प्रदूषित पाण्यामुळे आजार फोफावल्याची व्यक्त केली भिती….


खुटबाव: दौंड तालुक्यातील भीमा नदी , मुळा मुठा नदीपट्ट्यातील तसेच बेबी मुठा कालव्यालगत प्रदुर्षित पाण्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत चालल्याचे एका निष्कर्षाने पुढे येऊ लागले आहे. या भागात मागणी काळात कॅन्सरग्रस्त आजाराने रुग्ण आढळल्याचे धक्कादायक निष्कर्ष काही आरोग्य तज्ञ मंडळींकडून भिती व्यक्त होऊ लागल्याने या प्रदूर्षित पाण्याभोवती आजार संभवण्याचा धोका अधिक गडद होऊ लागल्याची भिती वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी बोलू लागली आहे.

दौंड तालुक्यातील मुळा- मुठा , भिमा नद्यांना रासानिक व किटकनाशक युक्तरसायन मिश्रीत पाण्याने मोठा धोका उद्मवला आहे. या रासायनिक युक्त प्रवाहाने नदीत तसेच कालव्यातील नैसर्गिक जलचर धोक्यात आले आहे. प्रदूषित पाण्याची मगरमिठ्ठी इतकी गठ्ठ होऊन बसली आहे की, सूक्ष्मजीव, जलचर व नदीतील पाण्यातील रासायनिक तवंग नद्यांचे मूळ प्रवाह प्रदूषित करुन मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करीत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष काढण्यात येत आहे. या पाण्याचे प्रदूषित घटक हे थेट पोटाच्या कर्करोगाची निमंत्रण देत असल्याने या संसंर्गाच्या भितीशी नद्यांचे प्रदूषित पाणी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला जात असून दौंड तालुक्यातील या नद्याशेजारील भागात रुग्ण आढळून येण्याचे प्रकार वाढल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

नुकताच दौंड तालुक्यामध्ये एका तरुण युवकाचा कर्करोगाने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कसलीही व्यसन नसणाऱ्या या युवकाचा मृत्यू झाल्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र कारणांची पडताळणी केली असता प्रदूषित पाण्याचा जंतूसंसर्गच अशा प्रकारे शरीरात प्रवेश करु शकतो असा प्राथमिक निष्कर्ष आहे.

       

या पार्श्वभूमीवर कर्करोग या आजाराबद्दल नदी व कालवे प्रदूषित असल्याची शक्यता सर्वाधिक असून नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने या आजाराचा धोका आहे. पूर्वी कर्करोग हा तंबाखू खाल्ल्याने व धुम्रपान केल्याने होतो असे म्हटले जायचे. मात्र आजकाल कर्करोग हा दारू सेवन, कीटकनाशक व खतांच्या वापरातील भाजीपाला व अन्नधान्य खाणे, स्थूलता, तणाव, अनुवंशिकता, बदलती जीवनशैली या कारणांमुळे सुद्धा होत आहे असाही निष्कर्ष आहे. परंतु हे कर्करोगाचे प्रमाण दर १०० नागरिकामागे २.१ आहे इतक्या स्थितीत आल्याने प्रदूषित पाणी आजाराला निमंत्रण देत असल्याचा वैद्यकिय तज्ञ मंडळी बोलत आहे.

सार्वजनिक या आजाराची पुरुष आणि महिला यांच्या वर्गवारीत महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. अनेक महिलांना स्तनांचा कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले आहे. कोल्हापूर, जयपुर ,गडचिरोली व गुडगाव ही ठिकाणे कॅन्सर बेल्ट म्हणून ओळखली जातात .त्याप्रमाणे भविष्यातील नदीपट्ट्यातील हे प्रमाण आढळून येत असल्याने दिवसेंदिवस कॅन्सर झोन म्हणून पुढे येत आहेत अशीही काही मते पुढे येत आहेत . नियमित व्यायाम, नदी प्रदूषण रोखणे , स्थिर जीवनशैली यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

-डॉ. विशाल खळदकर ( कॅन्सर तज्ञ)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!