Cabinet Meeting : देशी गायी आता ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषीत, राज्य सरकारचा मोठा निर्णय..


Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत गायीला राज्य माता- गोमातेचा दर्जा घोषित केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आल्याने शिंदे सरकारचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचं मानलं जात आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांनी स्वागतही केले आहे.

आज कॅबिनेटची बैठक झाली. यावेळी राज्यातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा जीआरही काढण्यात आला आहे.

भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच राज्यात देशी गायी घटल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. Cabinet Meeting

प्राचीन काळात माणसाच्या जीवनात गायीचं अद्वितीय महत्त्व होते. वैदिक काळात गायींना धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे गायीला कामधेनूही म्हटलं गेलं. राज्यातील विविध भागात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. मराठवाड्यात देवनी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी आणि विदर्भात गवलाऊ आदी जाती आढळतात. पण राज्यात दिवसेंदिवस गायींची संख्याही कमी होताना दिसत असल्याचं जीआरमध्ये म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!