कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

कर्नाटक : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्नाटकात आता नवे मंत्री तयार करण्यात आले आहेत. सिद्धरामय्या आणि डी.के शिवकुमार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून २६ मे रोजी संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब करुन घेतले.

एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, कायथसंद्र एन. राजन्ना, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, शिवराज संगप्पा तंगडगी, डॉ. शरण प्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, डी. सुधाकर, संतोष लाड, एनएस बोसेराजू, सुरेश बी. एस., मधू बंगारप्पा, डॉ. एम. सी. सुधाकर आणि बी. नागेंद्र यांचा समावेश आहे. त्यांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.